Breaking News

संभजी भिडे यांना विनाअट जामीन मंजूरनाशिक (प्रतिनिधी) वादगस्त विधान प्रकरणी संभाजी भिडे आज नाशिक येथील न्यायालयात हजर झाले. कोणत्याही अटी आणि शर्तींविना भिडे गुरुजींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. फक्त 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातली पुढील सुनावणी 14 तारखेला होणार आहे.

सुनावणीस कायम गैरहजर राहण्याच्या भिडे यांच्या अर्जावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे भिडे यांचे वकील अ‍ॅॅड. अविनाश भिडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, पुढच्या सुनावणीला ते न्यायालयात हजर राहणार असल्याची माहितीही त्यांच्या वकिलाकडून देण्यात आली आहे. गेल्या अनेक तारखांना भिडे न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यासाठी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर आज भिडे यांनी न्यायालयात हजेरी लावली.

भिडे न्यायालयात आल्यानंतर शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. भिडे यांची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने भिडे यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते; पण माझे वय 83 आहे. त्यामुळे मला सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी द्या, असा अर्ज भिडे यांच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आला होता.