Breaking News

डिवायएसपी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हे दाखल करा : रिपाइंची मागणी बुलडाणा,(प्रतिनिधी): भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतांना जी शपथ घेतली जाते त्याच्यात जात, धर्म, भाषा, परिवार, लिंग कधीच येवू देणार नाही असा उल्लेख असतो, परंतु माजलगाव जिल्हा बीड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी ती प्रतिज्ञा तोडून कायद्याचा गैरवापर केला. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम महिला आयपीएस अधिकार्‍यांनी केले.

ही गंभीर  बाब असून तसा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या जातीयवादी महिला अधिकार्यांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधित कायद्याखाली गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ सेवेतून बढतर्फ करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(ए)च्या वतीने एका निवेदनाव्दारे देण्यात आला. निवेदन देतेवेळी बाबासाहेब जाधव, विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे, जिल्हा महीलाध्यक्षा आशाताई वानखडे, जिल्हासंघटक भाऊसाहेब सरदार, जिल्हा कार्यध्यक्ष मुरलीधर गवई, संतोष इंगळे जिल्हा उपाध्यक्ष, सुनिता काकडे महीला उपाध्यक्षा, समाधान गवई माजी ता.अध्यक्ष, पुरुषोत्तम बोर्डे, शरद खरात, वंदना शर्मा, भास्कर जाधव, प्रल्हाद कांबळे,संजय हिवाळे, रवि भोंडे, रमेश साळवे, निंबाजी पानपाटील, मधुकर सुरडकर उपस्थित होते.