Breaking News

वैद्यकीय कायदेविषयक चर्चासत्रास उत्फूर्त प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी -
नगरच्या वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणार्‍या आयुर्वेद अ‍ॅकेडमीच्या वतीने नगरमधील वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये वैद्यकीय कायद्या विषयक सजगता आणण्यासाठी ‘मेडिकोलिगल अस्पेक्टस् अपडेट 2018’ या एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात बीएएमएस, बीएचएमएस व बीयुएमएस पदवीधर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चर्चासत्राचे उद्घाटन धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलनाने सातारा येथील ख्यातनाम न्यायवैद्यक तज्ञ डॉ. अजित भगवान यांच्या हस्ते झाले. 

यावेळी डॉ. कैलास गौड, कोटक लाईफचे उपाध्यक्ष डॉ. मंगरीश रांगणेकर, आयुर्वेदतज्ञ डॉ. दत्तात्रय गिरगे, डॉ. चंद्रकांत केवळ, डॉ. महेंद्र शिंदे, डॉ. मंगेश काळे, डॉ. ज्योती चोपडे, डॉ. विक्रम म्हसे, डॉ. शौनक मिरीकर, डॉ. वनिता वाघ उपस्थित होते.