Breaking News

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय बैठक शिर्डीत संपन्नशिर्डी/प्रतिनिधी
महराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय खेमनर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रामनाथजी जर्हाड यांच्या हस्ते अजय कोळेकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी राज्यातून विविध जिल्ह्यातून पत्रकार बांधव उपस्थित होते. तसेच प्रदेश अध्यक्ष किरण शेलार, राज्य सचिव राजेंद्र बनकर, संपर्क प्रमुख साईप्रसाद कुंभकर्ण, शांताताई चव्हाण, गणेश खेमनर आदी मान्यवर उपस्थित होते.