Breaking News

मी वडार महाराष्ट्राचा मेळाव्याला हजारो कार्यकर्ते जाणार- गायकवाड

 
बीड (प्रतिनिधी) :  सोलापूर येथील मी वडार महाराष्ट्राचा राज्यस्तरीय महामेळावा दि.  १७ डिसेंबर रोजी दुपारी  १२:३० वा. होत आहे. या मेळाव्यास वडार समाज बांधवव बीडमधून मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती सुनील गायकवाड यांनी दिली.
वडार समाजाचा अनूसुचीत जाती जमाती मध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी मी वडार महाराष्ट्राचा राज्यस्तरीय महामेळावयाचे आयोजन केले आहे.  या मेळाव्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, रिपाईचे  रामदास आठवले यांची उपस्थिती राहणार आहे. तरी वडार समाज बांधवांनी हजारो च्या संख्येने इंदिरा गांधी स्टेडियमवरवर उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या  जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड यांनी केले आहे. या वेळी महेंद्र गायकवाड, राजू कुसळकर, सचिन विटकर, पंडित कुराडे, विलास शिंदे, संतोष कुर्‍हाडे, बालाजी कुसळकर, बळी कुसळकर आदी उपस्थित होते.