सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून घुले उदयास : गोविंद सांगळेनगर । प्रतिनिधी -
हमाल पंचायतच्या माध्यमातून अविनाश घुले यांनी हमाल-मापाडी यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. स्व. शंकरराव घुले यांनी हमालांच्या प्रश्नांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी दाखविलेल्या सत्मार्गावरच आज अविनाश घुले आपली वाटचाल करत आहेत. त्यांच्या विविध क्षेत्रातील संपर्कामुळे अनेक संस्था, संघटनांमध्येही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. नागरिकांच्या असलेल्या जनसंपर्कामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणूनच पुन्हा नागरिकांनी त्यांना मनपाच्या नगरसेवकपदी विराजमान केले आहे. त्यामुळे जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून अविनाश घुले उदयास येत आहेत. याचा हमाल पंचायत परिवारास मोठा आनंद होत आहे. त्यांच्या कार्यास आमचे नेहमीच सर्वोतोपरि सहकार्य राहील, असे प्रतिपादन हमाल पंचायतीचे उपाध्यक्ष गोविंद सांगळे यांनी केले.

हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांची मनपाच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हमाल पंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रज्जाक शेखलाल शेख, सचिव मधुकर केकाण, कॉ. बाबा आरगडे, बहिरु कोतकर, सतीश शेळके, लक्ष्मीबाई कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी नगरसेवक अविनाश घुले म्हणाले, नागरिकांचे प्रेम आणि कष्टकर्‍यांचेे सहकार्य यामुळे आपण विविध पदांवर कार्यरत आहोत. सार्वजनिक जीवनात सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपण प्राधान्य दिले, त्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे नागरिक हे आपल्या पाठिशी उभे राहिले आहेत. हमाल पंचायतीच्यावतीने केलेला सत्कार हा माझा घरचा सत्कार आहे. या सत्कारामुळे मला आता आणखी काम करण्यास प्रेरणा मिळणार आहे. 

यावेळी रावसाहेब दराडे, रोहिदास बनसोडे, नवनाथ बडे, किसन सानप, दत्तू भोजने, नाथा वायभासे, रवींद्र भोसले, सुनील गिते, पांडुरंग चक्रनारायण, रामा पानसंबळ, विष्णू ढाकणे व हमाल मापाडी आदी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget