Breaking News

मंत्रीमंडळाच्या निर्णयाचे पदवीधर अंशकालीन कडुन स्वागतबुलडाणा,(प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षापासुन नोकरीच्या प्रतिक्षेत आंदोलन करणार्‍या पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना कंत्राटीपध्दतीने नोकरीवर घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने 11 डिसेंबर रोजी घेतला. या निर्णयाचे स्वागत जिल्हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले. यानिर्णयाबद्दल कौशल्य विकास अधिकारी चिमणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत संघटनेच्या वतीने 14 डिसेंबर रोजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी पदवीधर अंशकालीन संघटनेच्या मागण्यांवर नियुक्त केलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयाबद्दल ना.संभाजीराव निलंगेकर व पदवीधर अंशकालीन संघटनेची अशासकीय सदस्य सुरेखा अहिरराव यांचेही आभार या वेळी व्यक्त करण्यात आले. या वेळी संघटनेचे सचिव गणेश मांजरे, कोषाध्यक्ष संजय पवार,संघटक संजय टेकाळे, राजेंद्र गोदरकर,राजेंद्र सावळे, सुनिल भालेराव, संजय गवई, मकरंद देशपांडे, शे.कादर शे.युसुफ, विश्‍वनाथ घट्टे, मुरलीधर जाधव, सुनिलबापु देशमुख, संजय जाधव, गोविंदा इंगळे, रविंद्र जोशी वजय जाधव, अनंता गायकवाड, राजेश हिवाळे आदींची उपस्थिती होती.