Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच भारतीय लोकशाही सुदृढ व समृद्ध-बनसोडेमाजलगाव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानात शोषित, पीडित वंचित, दिन, दलित तसेच स्त्रियांना समान हक्क व अधिकार देऊन मानव हा केंद्रबिंदू मानून स्वातंत्र, समता, बंधुत्व, न्याय या मूलभूत तत्वाची रुजवणूक करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाही सदृढ व समृद्ध केली असे उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांनी सुंदरराव सोळंके महाविद्यालयात बोलताना प्रतिपादन केले. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुंदरराव सोळंके महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ व्ही पी पवार होते तर प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते मारोती बनसोडे हे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ के बी गंगणे,अधिक्षक गोपीनाथ हराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना बनसोडे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्व व्यापी होते.त्यांच्यामुळेच माणसाला माणूस म्हणून जीवन जगता आले.

अध्यक्षीय भाषण करताना डॉ. व्ही. पी. पवार म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा असा मूलमंत्र देऊन स्वाभिमानी जीवन जगण्याचा मार्ग दाखविला.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बालाजी बोडके यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ. ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा संजय बागुल यांनी मानले.कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.