Breaking News

जलयुक्त शिवार योजना सरकारच्या अपयशाचे जिवंत स्मारक; विधानसभेतील दुष्काळाच्या चर्चेवर आ.बोंद्रेंची घनाघाती टिका


चिखली,(प्रतिनिधी): राज्यात मोठा गाजा वाजा करून राबविण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना ही या सरकारच्या अपयशाचे जिवंत स्मारक ठरले असून या योजनेच्या आमलबजावणी नंतरही गावोगाव पाण्याच्या स्थितीत कुठलीही सुधारणा झालेली नाही. सन 2014 मध्ये आजच्या सारखी पावसाची परीस्थीती असतांना आणी यावर्षी हजारो कोटी रूपये खर्चुन जलयुक्त शिवार योजनेची कामे झालेली असतांना त्यावेळच्या तुलनेत 8 पट टॅकरची संख्या वाढली असल्याने ही योजना संपुर्णतः फसली असून ही योजना म्हणजे सरकारच्या अपयशाचे जिवंत स्मारक ठरली आहे. अशी घनाघाती टिका चिखलीचे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी विधानसभेत दुष्काळावरील चर्चेत बोलतांना केली.

विधानसभेत दुष्काळावरील चर्चेत भाग घेतांना आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी बुलडाणा जिल्हयासह संपुर्ण राज्याची आकडेवारी मांडून जलयुक्त शिवार योजनेचे अपयश अधोरीखीत केले. सन 2014 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत 70.2 पडलेल्या पावसाची आकडेवारी मांडुन त्याच तारखेला 2018 मध्ये नोव्हेंबर पर्यंत पडलेला पाउस 74.3 असल्याचे नमुद करीत, सन 2014 मध्ये जिथे 109 टॅकर सुरू होती, तेथे आज 2018 मध्ये 816 टॅकर सुरू असल्याचे सांगुन जलयुक्त शिवार योजने साठी झालेला 7789 कोटी रूपये खर्च कोठे गेला असा प्रश्‍न उपस्थित केला. ऐवढा कोटयावधी रूपये खर्च करूनही तुलनेत 8 पट टॅकर सुरू असणे, याला या योजनेचे अपयशच म्हणता येईल असे ठणकावून सांगितले. या भाषणा दरम्यानच बुलडाणा जिल्हयातील आकडेवारी देतांनाच 2014 मध्ये चिखली मतदार संघात भगिरथ जलसंजीवनी अंतर्गत लोकसहभागातून जी धोडीफार कामे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांचे पुढाकाराने झाली. त्या नदी खोलीकरणाच्या कामात आजही पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय ज्या हातणी ता. चिखली येथील नदीवर हे खोलीकरण करण्यात आले त्या हातणी गावाला त्यावेळी 12 महिने टॅकर लावावे लागत होते, त्या हातणी गावाला आज 3 वर्ष उलटली तरी पाण्यासाठी टॅकर लावण्याची वेळ आली नाही. ही बाब नमुद करून या उलट जलयुक्त शिवार योजने अंतर्गत बुलडाणा जिल्हयात शासनाने 700 कोटी रूपये खर्च केले, तरीही जिल्हयात कोठेही त्या कामामध्ये पाणी साठा उपलब्ध नाही हे स्पष्ट दिसुन येत असल्याने हा पैसा नेमका कोठे जिरला असा प्रश्‍न सभागृहासमोर उपस्थित करून यात या संपुर्ण कामाची चैकशी झाली पाहीजे अशी मागणी केली.       

बुलडाणा जिल्हयात मुख्यमंत्री यांच्या सोशल मेडीयामधील व्टिट नंतर लोकांना माहीत झालेले मोहखेड तालुका मेहकर येथील प्रकरणा विषयी बोलतांना प्रत्यक्षात गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध नसतांना जलयुक्त शिवारमुळे मोहखेड झाले पाणीदार असे दिशाभुल करणारे व्टिट मुख्यमंत्री यांनी केले. तेथे शेत शिवारात रब्बीसाठी पाणी नाही, झालेल्या जलयुक्तच्या कामामध्ये पाणी साठा नाही, तर गावाला पाणी पिण्यासाठी विहीर अधिग्रहन करण्याची वेळ आली आहे. असे असतांनाही मोहखेड गाव शिवारात लबालब पाणी अशा खोटया बातम्या छापून आनल्या गेल्या. भुजल पातळी प्रत्यक्षात कमी झालेली असतांना वाढली असे खोटे दावे अधिकार नसलेल्यांकडून करण्यात आले. व महाराष्ट्रातील जनतेची जलयुक्त शिवार योजने संदर्भात फसवणुक केल्या गेली ही बाब मांडून तेथील कामाचीही चैकशी करण्याची मागणी  आ.बोंद्रे यांनी केली. मुख्यमंत्री यांचे व्टिट खोटया माहीतीच्या आधारावर - आ.दिलीप वळसे पाटील आमदार राहुल बोंद्रे यांचे विधानसभेत भाषण सुरू असतांना आमदार दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत चर्चेत सहभागी होवून, मुख्यमंत्री ज्यावेळेस या विषयावर व्टिट करतात त्यावेळेस त्यांनी प्रकरणाची संपुर्ण माहिती घेवूनच व्टिट केले पाहीजे,  या गावात आ.बोंद्रे व विरोधी पक्षनेता नामदार राधाकृष्ण विखे पाटील जातीने जावून प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. आमदार सत्य सभागृहासमोर मांडीत आहेत, त्यांचे बोलणे खोटे नाही  याची नोंद घेण्यात यावी  असे सांगुन ही खोटी माहीती ज्या अधिका-यांनी त्यांना दिली त्या अधिका-यावर काय कारवाई केली अशी विचारणा करीत संबंधीत अधिका-याला निलंबीत केले पाहीजे असे सुचविले.