Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर बुद्ध-भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजनबुलडाणा,(प्रतिनिधी): महात्मा ज्योतिबा फूले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती  बुलडाणाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिवस व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता गांधी भवन जयस्तंभ चौक येथे कडुबाई खरात, औरंगाबाद यांच्या अभिवादनपर बुद्ध-भिमगितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील व अध्यक्ष म्हणून समृद्धी महामार्गाचे अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून अमोल हेरोळे, डॉ.गणेश गायकवाड, दादासाहेब काटकर, जगन्नाथ कांबळे, सुरेश देवकर, डॉ.राजेश्‍वर उबरहंडे, बाळासाहेब गिरहे, सौ.लताताई निकाळजे हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, समितीचे अध्यक्ष कुणाल पैठणकर, विनोद इंगळे, प्रा.डी.आर.माळी, प्रा.डॉ.गौतम अंभोरे, सिद्धार्थ आराख, राजेश टारपे, अनिल रिंढे, श्रीकांत जाधव, पंजााबराव निकाळजे, प्रा.प्रदिप जाधव, निलेश राउत, रामदास दाभाडे, जी.एम.कड, उदय सुरडकर, मयुर बोर्डे, प्रशांत तेलंग व सर्व समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.