Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते : सानंदा भारतीय बौध्द महासभेच्या वतीने महामानवाला अभिवादन
 खामगांव,(प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय, बंधुता, मानवी हक्क, स्वातंत्र्य यासाठी आयुष्यभर संघर्श करून समतेचा मार्ग दाखविला. समतेचा मुलमंत्र देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खर्‍या अर्थाने सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. असे प्रतिपादन माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खामगांव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.   याप्रसंगी बाजार समितीचे सभापती संतोष टाले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार,  सचिव अशोक मुळे, श्रीकृष्ण धोटे, भारिप बहुजन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शरद वसतकार,गणेश  चैाकसे, भारतीय बौध्द महासभेचे शहर अध्यक्ष दादाराव हेलोडे, भारिपचे तालुका अध्यक्ष संघपाल जाधव, शहर अध्यक्ष सचिन ठाकरे,  अनिताताई डोंगरे, रमेश डोंगरे, रिपब्लीकन संघटनेचे विश्‍वनाथ दांडगे, पंजाबराव देशमुख आदिंची उपस्थिती होती. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समतेचा मुलमंत्र दिला उपेक्षितांना घटनेच्या माध्यमातून आरक्षण मिळवून दिले परंतू सध्या काही आरक्षण विरोधी दृष्टप्रवृत्तींनी घटना बदलण्याचे षडयंत्र चालविले आहे. देशात जातीयवादाच्या नावावर सर्वत्र हिंसाचार सुरू आहे.

अशा देशविघातक प्रवृत्ती विरूध्द एकजुट होउन सर्वशक्तीनिशी लढा देणे ही काळाची गरज असल्याचे सानंदा म्हणाले. ज्येष्ठ नेते विश्‍वनाथ दांडगे यांनी  सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे नेते होते. बाबासाहेबांनी समतेचा मूलमंत्र दिला. त्यांच्या 22 प्रतिज्ञांचा अनुयायांना विसर पडला आहे. देशात शांतता नांदावी या करीता बाबासाहेबांच्या पुरोगामी विचार प्रत्यक्षात अमलात आणणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. भारिप बहुजन महासंघाचे शरद वसतकार म्हणाले की, बुध्दांचे विचार देशाला जागतिक पातळीवर नेउ शकतात. असे बाबासाहेब नेहमी सांगायचे. देश सुजलाम-सुफलाम  बनविण्यासाठी सामाजिक बांधीलकी व राष्ट्र निष्ठा जोपासण्यासाठी बुध्दांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी बुध्द वंदना घेण्यात आली. माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो अनुयायांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्प अर्पण करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. या कार्यक्रमाला प्रा. एम.आर.इंगळे, प्रा.डि.एस. वानखडे, राजीव भाउ वानखडे, मुळे साहेब, सिध्दार्थ इंगळे, डॉ. अनील वानखडे, मेजर आर.एन.गवई, बी.के. हिवराळे, विक्रम नितनवरे, ओंकार मोरे, दगडू सरदार, व्ही.एम.भोजने, जे.के.रणित, हर्षवर्धन खंडारे, अमन हेलोडे, शेेख बब्बु, गजानन दामोदर, संदिप वानखडे, संघपाल वाकोडे, सुभाश सुरवाडे, अ‍ॅड.गायगोळ, नथ्थुभाउ मोरे, बाजार समितीचे उपसभापती निलेश पिदके, विशाखाबाई सावंग, सुमनबाई खाटे, गिताबाई नरवाडे, एस.एस.इंगळे यांच्यासह भारतीय बौध्द महासभेचे, रिपब्लीकन संघटनेचे भारिप बहुजन महासंघाचे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बौध्द उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन विश्‍वनाथ हिवराळे यांनी केले.