Breaking News

ट्रकने बुलेटला उडविले; एक ठार, दोघे जखमीअंबाजोगाई, (प्रतिनिधी)- अंबाजोगाई - लोखंडी सावरगाव रोडवर लातूर टी पॉईंट येथे आज बुधवारी रात्री उशीरा ट्रक आणि बुलेटच्या भीषण अपघातात एक तरूण जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले आहेत.

रवी उत्तरेश्वर धायगुडे (वय २६, रा. बनसारोळा, ता. केज) असे मयत तरूणाचे नाव आहे. रवी आणि त्याचे मित्र अतुल बोराडे आणि जोगदंड बुलेट गाडीवरून अंबाजोगाईहून बनसारोळाकडे निघाले होते. रात्री ११.१५ वाजता ते लातूर टी पाईंटजवळ आले असता लातूरकडून येणार्‍या ट्रकने त्यांच्या बुलेटला जोराची धडक दिली.

 या अपघातात रवी धायगुडे याचा जागीच मृत्यू झाला तर बोराडे आणि जोगदंड गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.