पाणी फौंडशनचे कार्य पूर्ण क्षमतेने करूया : शरद मगरकोरेगाव, (प्रतिनिधी) : पाणी फौंडेशनचे कार्य स्तुत्य असून अधिकाधिक गावे पाणीदार करण्यासाठी आपण सर्वांनीच पूर्ण क्षमतेने सहकार्य करूया, असे मत गटविकास अधिकारी शरद मगर यांनी व्यक्त केले आहे.

सन 2019 साठीच्या जलसंधारण कामांच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.या वेळी पाणी फौंडेशनचे समन्वयक आबा लाड, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नलवडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

सलग चौथ्या वर्षी या अभियानात पाणी फौंडेशनने कोरेगाव तालुक्याचा समावेश करून आपणास पुन्हा पुन्हा मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून हे अभियान यशस्वी करावे.

 हे पुण्याईचे काम असून ते स्वयंस्फूर्तीने करावे. कोरेगाव तालुक्यात 142 गावांमध्ये मनरेगाचे कार्य मोठ्या गतीने सुरू आहे, ही बाब कौतुकास्पदच आहे. ग्रामपंचायतींनी तातडीने रोजगारसेवक नेमावेत, शोषखड्ड्यांचे प्रस्ताव द्यावेत, जलयुक्त शिवार योजनेचे कामही चांगल्यारितीने सुरू असून सरपंच, ग्रामसेवक व अधिकारी, पदाधिकार्‍यांनी या सर्व योजनांच्या यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग द्यावा, असेही या वेळी श्री. मगर यांनी सांगितले. 

आबा लाड यांनी पाणी फौंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली, तसेच श्री. नलवडे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांनीही यावेळी उत्सफूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी विस्तार अधिकारी श्री. घारे, श्री. जगताप, श्रीमती जाधव, अभियंता श्री. पत्की, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी आदींसह मोठ्या प्रमाणावर शासकीय प्रतिनिधी व गावोगावचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget