Breaking News

वळईत सासनकाठी यात्रा उत्साहातदहिवडी, (प्रतिनिधी) : पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या वळईतील भोजलिंग सर्वलिंग देवांच्या सासन यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. या यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांच्या साक्षीने चांगभल्याच्या गजरात ढोलाच्या आवाजात भक्तीभावाने यात्रेत चांगलीच रंगत आली. बुधवारी सांयकाळी जि. प. शाळा वळई येथील बालचमूंचा विविध गुणदर्शनाचा शानदार कार्यक्रम झाला. गुरुवारी सासन सोहळा झाला. ग्रामस्थ व यात्रेकरूंनी सासन आणि त्रिशूलांची भक्तीभावाने पूजा केली. दुपारी दोन वाजल्यापासून विविध गावांतील पथकांनी वळई येथे आपले पारंपारिक गजी नृत्य करुन यात्रेची शोभा वाढवली. सायंकाळी चार वाजता भोजलिंग देवाचा त्रिशूल भोजलिंग गडावरुन वाजत गाजत चांगभलेच्या गजरात वळईमध्ये भक्तीभावाने आणण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेवून भक्तीभाव अर्पण केला.वळईत सासनकाठी यात्रा उत्साहात 

दहिवडी, दि. 7 (प्रतिनिधी) : पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या वळईतील भोजलिंग सर्वलिंग देवांच्या सासन यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. या यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांच्या साक्षीने चांगभल्याच्या गजरात ढोलाच्या आवाजात भक्तीभावाने यात्रेत चांगलीच रंगत आली. बुधवारी सांयकाळी जि. प. शाळा वळई येथील बालचमूंचा विविध गुणदर्शनाचा शानदार कार्यक्रम झाला. गुरुवारी सासन सोहळा झाला. ग्रामस्थ व यात्रेकरूंनी सासन आणि त्रिशूलांची भक्तीभावाने पूजा केली. दुपारी दोन वाजल्यापासून विविध गावांतील पथकांनी वळई येथे आपले पारंपारिक गजी नृत्य करुन यात्रेची शोभा वाढवली. सायंकाळी चार वाजता भोजलिंग देवाचा त्रिशूल भोजलिंग गडावरुन वाजत गाजत चांगभलेच्या गजरात वळईमध्ये भक्तीभावाने आणण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेवून भक्तीभाव अर्पण केला.