थंडीत दादांना जगतापांमुळे फुटला घाम| माजलगाव :- काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी मोहन जगताप यांच्या वर टिका करतांना औकात काढली होती. वाड्यावस्यावर फिरतांना दुष्काळी परिस्थीती गंभीर असल्याचे सोळंके यांना जानवत आहे. परंतु सतेचा उपभोग घेतांना वाड्यावस्या कश्या दिसल्या नाहीत? असा गंभीर प्रश्‍न सर्व सामान्या नागरीक विचारत आहेत. दुष्काळाची पहाणी करतांना गंभीरता ओळखा नुसते देखाव्याचे नाटक करू नका असे एका शाखा उद्घाटन प्रसंगी मोहन जगताप यांनी म्हटले होते. याचे प्रतिउत्तर देतांना प्रकाश सोळंके यांनी खालच्या पातळीवर जावून औकात काढत हिम्मत असेल तर २०१९च्या लोकसभा-विधानसभा रनसंग्रामात तुमची सगळी औकात काढुत असे म्हटले. 

गेल्या दोन वर्षा पासुन माजलगाव मतदार संघात मोहन जगताप मित्र मंडळाच्या माध्यमातुन गावगावत शाखा करणार्‍या जगतापांचा माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके यांनी चागलाच धसका घेतला असल्याचे दिसत आहे. मंत्रीपद असतांना संमान्याना कधीही न भेटणारे सोळंके आता वाड्यावस्यावर फिरत आहेत. जनतेला धिर देण्याचे काम करत असातांना फक्त पोकळ गप्पा मारत दुष्काळी पहाणीचे नाटक करु नका असे एका शाखे प्रसंगी मोहन जगताप यांनी म्हटले होते.

 त्याचे प्रतीउत्तर काल पत्रकार परिषद घेवून सोळंके यांनी दिले. ऐरव्ही पत्रकारांना न भेटणारे दादा आर्वजुन पत्रकारांना निमंत्रण देत असल्याने पत्रकारतही अश्‍चर्य व्यक्त केले जात होते. पत्रकार परिषदेमध्ये मोहन जगताप यांच्यावर टिका करतांना जिल्हा परिषदमध्ये कोरी पाटी व पंचायत समितीमध्ये एका जागा असणार्‍या जगतापांना औकातीत राहण्याची भाषा वापरली याचा अर्थ मागील काही वर्षा पासुन मोहन जगताप यांनी मित्र मंडळाच्या साह्याने जे जाळे मतदार संघात निर्माण केले आहे, त्यांची भिती भविष्यातील निवडूकासाठी दादा घेत असल्याचे चेहर्‍यावरून स्पष्ट जानवत होते. 

सत्तेपासुन दुर झालेले दादा स्वत:हाला हतबल समजू लागले असल्याने अश्या भाष्याची वापर करु लागले असल्याची चर्चा जनतेतुन होत आहे. येणार्‍या विधानसभेसाठी माजलगाव मतदार संघात मोहन जगताप हे तगडे प्रतीस्पर्धी होवू शकतात याची भिती सोळंकेना जानवत आहे. यामुळेच त्यांच्या या विधानाला अधिक महत्व आले आहे. विधानसभा डोळ्यासमोर असतांना दादांचा शब्दावरून तोल जात आहे. राजकीय पटलावर अनेक वर्ष राज्य करणार्‍या माजी मंत्र्यांना स्वत:हा उत्तर देण्याची वेळ येती यातच सर्व काही स्पष्ट होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget