Breaking News

टिळकनगर येथे गोवर रुबेला लसीकरण


श्रीरामपूर/प्रतिनिधी
टिळकनगर येथील अंगणवाडीमध्ये गोवर, रुबेला लसीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. रांजणखोल ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या सविता बागुल, परवीन शेख, रजिया शकील पठाण, मंगल गणेश आवारे, यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी आरोग्यसेविका शीतल दिवे यांनी बालकांचे आजार, प्रतिबंधात्मक उपाय योजना, गोवर व रुबेला आजाराचे दुष्परिणाम आदींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील पंधरा वयोगटापर्यंत बालकांना शंभर टक्के लसीकरण करण्यात आले. आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका शीतल दिवे, गटप्रवतक गायत्री गडाख, आशाताई, कडूबाई हिवाळे, अंगणवाडीसेविका सायरा शेख, मदतनीस लता शेळके यांनी लसीकरण केले. याप्रसंगी पालक वर्गासह, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.