दूध अनुदानप्रश्‍नी रस्त्यावर उतरू खा. शेट्टी यांचा इशारा; सव्वादोनशे कोटी थकीत


पुणे (प्रतिनिधी)- सरकार व दूध संघाच्या वादात दूध उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. दूध संघांनी शेतकर्‍यांना दिलेल्या दरातील अनुदानाची दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये रक्कम सरकारकडे थकीत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर वीसच रुपये दर मिळत असून त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. त्यावर तातडीने तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरू,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुधाला वाजवी भाव मिळण्यासाठी संघटनेने जुलैमध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर गायीच्या दुधाला 3.5 स्निग्धांश व 8.5 उष्मांकाला प्रतिलीटर 25 रुपये दर सरकारने सर्व संघांशी चर्चा करून निश्‍चित केला. त्यातील पाच रुपये प्रतिलीटर अनुदान एक ऑगस्टपासून सरकारने देण्यास सुरुवात केली. दूध संघांनी ऑनलाईन माहिती भरूनही प्रशासनाकडून चालढकल होत आहे. सर्वच संघाचे अनुदान 10 सप्टेंबर नंतर देणे बाकी आहे. अनुदान वेळेत न मिळाल्याने शेतकर्‍यांना कमी दर मिळण्यास सुरुवात झाली आहे. आमच्याकडे अनुदानासाठी पैसे आहेत, असा दावा सरकार करते; मात्र प्रत्यक्षात यामध्ये शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होत असून अनुदानाचा प्रश्‍न सरकार व दूध संघानी त्वरित मिटवावा, अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल.

पर्यावरण विभागाने प्लास्टिक बंदी केल्याने दुधाच्या पाऊच पॅकिंगचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्यामुळे आधी वेफर्स, गुटखा यांचे पाऊच बंद करा, मगच दूध पिशव्यांकडे वळा, अशी मागणी करत या नियमातून दूध पिशव्यांना वगळावे, अशी मागणी खा. शेट्टी यांनी केली. 

शेट्टी यांची स्पष्ट मते

केंद्र सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही 
 खासगी विमा कंपन्या पोसण्यासाठीच पंतप्रधान कृषी पीक विमा योजना 
 माझी जात शेतकर्‍याची, धर्म कृषक आहे 
 बाटलीतून दूध दिल्यास ग्राहकांवर बोजा पडेल 
शेतकर्‍यांची पूर्णपणे कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार्‍यांसोबत आम्ही युती करू 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget