स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ठिया आंदोलनाला यश


घोटण/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर ऊस उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. मागील गळीत हंगाम सन 2017-18 ची थकीत बाकी असलेले शेतकर्‍यांचे पेमेंट तात्काळ मिळावे या उद्देशाने शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सुमारे तीन तास ठिया दिल्यानंतर कारखानदार व प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याआधीही वारंवार शेतकरी व संघटनेच्या माध्यमातून पेमेंट वर्ग करण्यासाठी निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. परंतु कारखानदार चालढकल करत असल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले. 

शेतकर्‍यांना दिलेले काही चेक वटविल्याने झाल्याने शेतकर्‍यांची मोठी निराशा झाली होती. मागील गळीत हंगामामध्ये अतुल दुगड यांना भाडेतत्त्वावर कारखाना दिला होता. परंतु यामध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याने, शेतकरी व संघटनेने कारखान्याला जबाबदार धरून तात्काळ पेमेंट वर्ग करण्याची कारखानदारांकडे मागणी लावून धरल्याने कारखान्याचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी स्वतः फोनवर संवाद साधून येत्या 4 तारखेनंतर टप्प्याटप्प्याने रक्कम अदा करण्यात येईल असे सांगितले. व नंतर तहसीलदार व प्रशासनाच्या मध्यस्थीने लेखी सुरुवात दिलेल्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी प्रशासनाच्यावतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतोष गायकवाड, दत्तात्रय फुंदे, संदीप मोटकर, योगेश पातळ, मुकुंद जगताप, निखिल कचरे, लक्ष्मण सोणावने, बाबासाहेब ढाकणे, विठ्ठल सोणावने आदी शेतकरी कारखान्याचे संचालक शरद सोणावने, काटे साहेब कारखान्याचे कार्यकारी संचालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget