Breaking News

डॉ.धनंजय दातार युएईतील सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीतबुलडाणा,(प्रतिनिधी): ‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना ‘अरेबियन बिझनेस’तर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत वर्ष 2018 साठी 18 वे मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे.

 या यादीत समावेश असलेले डॉ.दातार हे एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत. ‘मसालाकिंग’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणार्‍या डॉ. दातार म्हणाले, अरेबियन बिझनेस हे जगातील अत्यंत विश्‍वसनीय माध्यमांपैकी एक असून त्यांनी अरब विभागातील प्रगतीप्रती माझ्या आकांक्षेची व योगदानाची दखल घेऊन मला मानांकन दिले आहे. हा खरंच माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या यादीत नावाची नोंद करण्यामागे अशा ताकदवान व प्रभावी भारतीय नेतृत्वांचा गौरव करण्याचा हेतू आहे, जे आपला दृष्टीकोन व गुंतवणूक यांच्या माध्यमातून अरब जगताला आकार देत आहेत. या कर्तृत्ववान भारतीय उद्योजकांनी आपली दूरदृष्टी, अस्सलता व चमकदार नेतृत्वाचा वापर करुन आपल्या भागधारकांसाठी, तसेच अर्थव्यवस्थांसाठी भांडवल निर्मिती करुन पश्‍चिम आशियात अत्यंत यशस्वी कंपन्या स्थापन केल्या आहेत.

 हे मानांकन म्हणजे अरब जगतात वास्तव्यास असलेल्या किंवा व्यवसाय चालवणार्‍या भारतीय व्यावसायिकांचे सखोल संशोधन व विश्‍लेषण यांचे फलित आहे.  डॉ. दातार पुढे म्हणाले, पुरस्कार व गौरव आपण करत असलेल्या कार्याची जबाबदारी वाढवतात. आम्हीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन आमच्या ग्राहकांना वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहू, मला मिळालेला सन्मान हे आमच्या संपूर्ण संघटनेच्या समर्पित सांघिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आमच्या प्रयत्नांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणार्‍या संयुक्त अरब अमिरातीचीच्या शासकांचाही मी आभारी आहे.

या यादीतील बहुसंख्य आघाडीचे उद्योजक व व्यवसाय मालक हे संयुक्त अरब अमिरातीतील आहेत. यावरुनच आम्हाला येथील नेतृत्वाकडून मिळत असलेल्या पाठबळाचा स्पष्ट प्रत्यय येतो. -