Breaking News

कास्ट्राईब महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्ता रणसिंग यांची निवड


अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्ता रणसिंग यांची निवड करण्यात आली. नुकतीच नगरमध्ये कास्ट्राईब महासंघाची नाशिक विभागीय बैठक राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी रणसिंग यांच्या निवडीची घोषणा केली.
याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष सयाजी खरात, राज्य सहसचिव निवृत्ती आरु, नाशिक विभागीय अध्यक्ष ना.म. साठे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, कृषी विद्यापिठाचे डॉ.सुरेश उबाळे, बाळासाहेब घोडके, गुलाबराव जावळे, सुभाष पोटे, डॉ.एस.के. कांबळे, डॉ.कैलास कांबळे, लुईस पाळंदे आदींसह कास्ट्राईबचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याध्यक्ष पवळे यांनी रणसिंग यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दत्ता रणसिंग यांचे चालू असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे के.के. जाधव यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना रणसिंग यांनी शासकीय कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. दत्ता रणसिंग हे रिमांड होममध्ये शासकीय सेवेत असून, ते अहमदनगर जिल्हा बॉडी बिल्डींग असो.चे सचिव आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल जयंत गीते, विक्रम भोगाडे, जावेद शेख, उमेश कोरडे, निर्मल शिंदे, बंटी भिंगारदिवे, शशीकांत गायकवाड, किरण देशमुख, आसिफ खान, पापा गायकवाड, सोहेल शेख, सनी भवरे, किशन कल्याणी आदिंसह कास्ट्राईब महासंघाचे व बॉडी बिल्डींगचे असो.च्या पदाधिकार्‍यांची त्यांचे अभिनंदन केले आहे.