Breaking News

वाठार किरोलीत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन


रहिमतपूर (प्रतिनिधी) : वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे वार्ड क्रमांक दोनमध्ये सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती सुनील काटकर, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, पं. स. सदस्य अण्णासाहेब निकम, सौ. शुभांगीताई काकडे, पांडुरंगबुवा गायकवाड, युवा नेते विवेक गायकवाड, भरतकाका गायकवाड, अनंततात्या साबळे, महेश उबाळे, प्रवीण भोसले, सीताराम गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, उध्दवराव गायकवाड, राजेंद्र गायकवाड, डॉ. विजय गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, मानाजी पवार, युवा मंचचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.