Breaking News

पाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा धूमाकुळ.

पाथर्डी (प्रतिनिधी) अभिजित खंडागळे तालुक्यातील मोहरी,घाटशिरस,येथे रात्री अज्ञात चोरट्याने दरोडा टाकला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारलाय तसेच रोख रक्कम ही चोरून नेली आहे.याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे. तर घाटशिरस येथे डॉग स्कॉड व फिंगर प्रिंटची मदत घेत चोरीचा काही पूरावा मिळतो का याचा शोध घेण्याचे काम चालू आहे.


जवखेड येथील एका इसमाचा चोरट्याने मोबाईल चोरी करून नेला आहे. तसेच शुक्रवारी दुपारी मिरी येथे व रात्री ६.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील गजबजलेल्या पेठेत वेदपाठक ज्वेलरी दुकानात येऊन अक्षय पठाडे (रा.आव्हाने) याने दोन तोळे लॉकेट आहे का याची विचारणा केली असता दुकानादार कृष्णा वेदपाठक याने दोन तोळे लॉकेट नसल्याचे सांगितले त्यानंतर पठाडे याने दोन तोळे हातातील ब्रासलेटची मागणी केली.त्यानंतर त्याने हातात ब्रासलेट घालून पळ काढला असता दुकानदार वेदपाठक याने आरडाओरडा केला तेव्हा नागरिकाने त्याला पकडत येथेच्छ धुलाई करत पोलीसाच्या हवाली केले असून त्याच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी धूमाकुळ घातला असून या चोराच्या सत्राने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकामध्ये असुरक्षितपणाची भावना निर्माण होत आहे.तर दुसरीकडे आधीच पाथर्डी पोलीस स्टेशनला अपुरे मनुष्यबळ असून सध्या अहमदनगर येथे महानगरपालिका निवडणूकीला पाथर्डी येथील कर्मचारी बंदोबस्त कामी गेले आहेत.तालुक्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारी समोर अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस यंत्रणा ही हतबल झाली आहे.