Breaking News

खटावला प्लॉस्टिकमुक्ती जनजागृती रॅली


पुसेगाव (प्रतिनिधी) : येथील शहाजीराजे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे नुकतीच प्लॉस्टिकमुक्ती जनजागृती रॅली काढून खटाव परिसरातील स्वच्छता करण्यात आली. खटावमधील इंदिरानगर, शास्त्रीनगर येथे रस्त्यांच्या दुतर्फा परिसर तसेच महाविद्यालयाच्या परिसरात असणार्‍या प्लॉस्टिक पिशव्या, कचरा आदींचीही विद्यार्थ्यांनी स्वच्छता केेली. 

त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजेनेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी स्वच्छता करीत रॅलीही काढण्यात आली. तसेच प्लॉस्टिकऐवजी कापडी पिशव्या वारण्याचे आवाहनही यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले. या उपक्रमात एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रामचंद्र पवार, प्रा. शेख, प्रा. शिवाजी खाडे, प्रा. देेशमुख, प्रा. भिसे आदींसह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवकांचा सहभाग होता.