Breaking News

व्यवसाय करदात्यांच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्धकल्याण : व्यवसाय करदात्यांच्या अडचणी सोडवण्यास कर विभाग कटिबद्ध असल्याची ग्वाही ठाणे व्यवसाय कर विभागाचे सहआयुक्तसंजीवकुमार कदम यांनी दिली. कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ई-सुलभता आठवड्याच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते. १ एप्रिल २०१६ पासून प्रलंबित असलेली व्यवसाय कर विवरणपत्रे ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत दाखल केल्यास उशीर झाल्याबद्दलचे विलंब शुल्क लागणार नाही, अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली. .

व्यवसाय कर हा राज्य शासनाचा एक महत्त्वाचा कर असून राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून त्याची अंमलबजावणी केली जाते. व्यवसाय करदात्यांना कर भरताना, विवरणपत्र भरताना उद्भवणाऱ्या अडचणी दूर करणे, नवीन नोंदणी दाखला घेण्यास मदत करणे तसेच त्यांना येणाऱ्या इतर तांत्रिक अडचणींचे निवारण करून व्यवसाय कराच्या महसुलात वाढ होण्याच्या हेतूने सहआयुक्तसंजीवकुमार यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड, मीरा-भाईंदर, पालघर, कल्याण या विभागातून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून संजीवकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कार्यालयात २६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत ई-सुलभता आठवडा साजरा करण्यात आला. करदात्यांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी व्यवसाय कर विभाग कटिबद्ध असल्याचे कदम यांनी सांगितले. कल्याण कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष निशिकांत बुधकर, सचिव गणेश शेळके यांनी व्यवसाय करदात्यांच्या अडचणी मांडल्या. .