Breaking News

दुष्काळाची वास्तव आकडेवारी द्या अधिकार्‍यांना शिवसेनेचा इशाराबीड (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बीड जिल्ह्यातील दुष्काळ आढावा बैठकीत कुचकामी आधिकार्‍यानी चुकीची आकडेवारी देऊन प्रशासनासह सरकारची दिशाभूल केली होती असा गलथान कारभार केंद्रीय पथकाच्या पाहणी दौर्‍यात घडू नये, आधिकार्‍यानी वास्तव आकडेवारी, दुष्काळाची सत्य परिस्थिती समोर आणावी असा सूचना वजा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची वास्तव पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल होत आहे या पार्शवभूमीवर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी जिल्हाप्रशासनाला सूचना वजा इशारा दिला आहे, बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा चुकीचा अहवाल दिल्यामुळे मुख्यमंत्र्यासमोर अधिकार्‍याचे पितळ उघडे पडले होते, आधिकार्‍यानी चुकीची माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा सर्वे करून योग्य आकडेवारी देण्याचे आदेश दिले गेले होत.