Breaking News

जिल्हा पुरवठा अधिकारांच्या आदेशाने काळेगावथडीचे दुकान निलंबनमाजलगाव, (प्रतिनिधी):-तालुक्यातील गव्हाण थडी येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी पुरवठा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तपासांती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सदरील स्वस्त धान्य दुकानाची व रॉकेल परवानाचे निलंबन केले आहे.

मौजे काळेगावथडी येथील स्वस्त धान्य दुकानचे परवानाधारक जगन्नाथ ज्ञानोबा तौर यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानतुन शासन नियमित असणारे आदेश, साठा दर्शविणारा फलक, स्वस्त धान्य दर्शवणारा अभिलेख नोंदवही न ठेवता कारभार चालवणे, शासन नियमीत भावात धान्य न वितरण करणे, किंवा बर्‍याच मोठ्या प्रमाणात धान्याचे वितरण न करणे आधी कारणास्तव सदरील दुकानाची तक्रार गावकर्‍यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे १२- ८ -२०१८ रोजी करण्यात आली होती सदरील तक्रारीची दखल घेत संबंधित धान्य दुकान विरोधात जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दरम्यान काळात अवलोकन केले व तपासी यंत्रणेमार्फत तपास केला असता तक्रारीत नमूद असलेल्या बाबींची सत्यता समोर आली. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी महाराष्ट्र फुड ग्रेन (पोलाइसइनिंग ऑर्डर १९६६ दि.) शासन वितरित अन्नधान्याचा साठवणूक करून ते लाभार्थ्यांपर्यंत विक्री न करण्याचा ठपका ठेवत काळेगावथिड येथील जगन्नाथ ज्ञानोबा तौर यांचे स्वस्त धान्य दुकान व रॉकेल परवान्याचे निलंबन केले आहे.