Breaking News

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अपंग दिन साजराबीड,(प्रतिनिधी) जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जागतिक अपंग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अपंग दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष कमलताई निंबाळकर यांनी परळीत दिव्यांगाचे हार घालून सन्मान केला.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष कमलताई निंबाळकर यांनी परळीत अपंग दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगांनी खचून न जाता र्धेर्याने जीवन जगावे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कमलताई निंबाळकर यांनी दिव्यांगाचा सन्मान केला. यावेळी दिव्यांगांच्या चेहर्यावर एकच हासू फुलले. त्यांनी कमलताई निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.