Breaking News

जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांच्याहस्ते दोन वर्गखोल्यांच्या कामांचे उद्घाटन


नगर । प्रतिनिधी -
नगर तालुक्यातील भातोडी येथील मराठी प्राथमिक व ऊर्दू प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्यांच्या कामाचे उद्घाटन नागरदेवळे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे व नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती प्रवीण कोकाटे यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच बाबासाहेब नेटके, सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष राजू पटेल, उपसरपंच भरत लबडे, शिवसेना युवानेते तथा ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा दरेकर, शिवसेना तालुका उपप्रमुख निसार शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष पापामिया पटेल, मेजर रियाज शेख, अशोक तरटे, शिवव्याख्याते प्रा. संजय टाक, घनश्याम राऊत, बंडू गायकवाड, पोपट पटेल, मच्छिंद्र लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

झोडगे म्हणाले, भातोडीमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठी विकासकामे होत आहेत. येथील शिवसेनेचे कार्यकर्ते खुप जागृत आहेत. त्यामुळे विविध कामांची मागणी करून कामाचा पाठपुरावा करीत असतात. आज एका खोलीची दुरूस्ती करण्यात आलेली आहे. तर ऊर्दू शाळेच्या एका वर्गखोलीचे बांधकाम करण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. दोन्ही वर्ग खोल्यांना जवळपास 9 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. अनेक वर्षांपासून या वर्ग खोल्यांची मागणी मुस्लिम व हिंदू समाजाकडून करण्यात आली होती. ती आज पूर्ण केली आहे.