Breaking News

‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे प्रकाशन


सातारा (प्रतिनिधी): माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचा डिसेंबरमधील विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार अमिता तळेकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महापरिनिर्वाणदिन विशेष आणि पूर्वीपेक्षा अधिक, पूर्वीपेक्षा उत्तम या विषयांवरील आधारित या विशेषांकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणार्‍या मान्यवरांच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तराखंड येथील मसुरी येथील लाल बहादूर शास्री अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या अधिकार्‍यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी मांडलेल्या भूमिका आणि जबाबदारी या विषयावरील भाषणाचा स्वैर अनुवाद या अंकात घेण्यात आला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील दोन यशकथांचाही समावेश या अंकात करण्यात आला आहे.