Breaking News

राहुरीत धुमस्टाईलने महिलेचे गंठण चोरीसराहुरी/प्रतिनिधी
राहुरी शहरातील बिरोबा नगर शिक्षक बँकसमोर एका 30 वर्षीय महिलेच्या गळ्यातील दोन तोळेचे गंठण दुचाकी स्वारांनी धुम स्टाईलने पळविल्याची घटना घडली आहे. याबाबत राहुरी येथील बिरोबा नगर येथील रहिवासी रेशमा संतोश धोंगडे या त्यांच्या घराकडुन शहरात पायी जात असतांना समोरुन एका दुचाकीवर दोघा भांमट्यांनी येऊन गळ्यातील गंठण धुमस्टाईलने पळविले. धोंगडे यांनी आरडा ओरड केला असता दुचाकी स्वार भांमटे सुसाट वेगाने पसार झाले होते. घटनेची माहिती राहुरी पोलिसांना कळताच स.पो निरिक्षक जयंत शिरसाट शिवाजी सरोदे यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेत आजु बाजुला असलेल्या सी सी टि व्हि कॅमेरा तपासणी दुपारी उशीरा पयर्ंत सुरु होती.

 सदर घटनेमुळे शहरातील महिलावर्गात भितीचे वातावरण पसरले असुन या घटनेचा तपास न लागल्यास शहरातील महिला पोलिस ठाण्यावर अांदोलन करण्याच्या तयारीत असुन राहुरी तालुक्यात गुन्हेगारीचा आकडा वाढत असुन राहुरी पोलिस ठाण्याकडे श्रीरामपुर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनमधुन होत असुन गेली तिन आठवड्यापासुन राहुरी शहरात भुरट्या चोरया, गंठण पळवणे, शेतकर्‍यांच्या मोटरी चोरी होणे, दुचाकी चोरी जाणे, हाणामारी घटना, आदी घटना घडत असतांना पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरीकांनमधुन बोलले जात आहे.