Breaking News

डॉ. आंबेडकरांचे राज्य समाजवादाचे स्वप्न भंगले : प्रा. डॉ. प्रभाकर पवारसातारा,(प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्य समाजवादाचे स्वप्न भंग पावले. ते प्रत्यक्षात उतरले असते तर भारताचेच नव्हे तर जगाचे सोने झाले असते. शेतकर्‍यांना आत्महत्त्या कराव्या लागल्या नसत्या, असे मत फलटणच्या मुधोजी कॉलेजचे मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी व्यक्त केले.येथील संबोधी प्रतिष्ठानतर्फे आयोजित थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेच्या 32 व्या वर्षाच्या विचारमालेत डॉ. आंबेडकर यांचा राज्य समाजवाद या विषयावर ते बोलत होते.

 विचारमंचावर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, रमेश इंजे उपस्थित होते. डॉ. पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला मरायला नाही, तर लढायला शिकवले. त्यांचा राज्य समाजवाद हा बुद्धांच्या भिक्कू संघाचा येथील भारतीय मातीतीलच होता. तक्षशिला, नालंदा येथील बुद्ध तत्वज्ञानाचा वैभवशाली वारसा नष्ट झाला. बाबासाहेबांना राज्यघटना मनासारखी तयार करता आली नाही व दुर्दैवाने त्यांचा राज्य समाजवाद देशाने स्वीकारला नाही. त्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले. जमिनीचे फेरवाटप, शेती कृषी, मोठ्या पायाभूत उद्योगांची सार्वजनिक मालकीची भूमिका संपत्तीचे एकत्रीकरणाची भूमिका असलेल्या बलाढ्य वर्गाच्या विरोधामुळे बाबासाहेबांचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.