Breaking News

पाण्याची व्यवस्था त्वरीत करा - काकडे; पाणीपुरवठा अभियंत्याना महिलांचा घेराव


शेवगाव/श.प्रतिनिधी 
शेवगाव तालुक्यातील सातपुते नगर येथे नगरपालिकेने पाण्याची त्वरित व्यवस्था करावी या मागणीसाठी जि.प.सदस्या हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता वारे ए.एम. यांना महिलांनी घेराव घातला. यावेळी क ाकडे म्हणाल्या कि, सातपुते नगर येथील नागरिकांची नगरपालिका अद्यापही पाणी कोटेशन भरुन घेत नाही. त्या सबबीखाली पिण्याचे पाणी देण्याचे टाळत आहे. संबंधित नागरिक कोटेशन भरण्यास तयार असून कोटेशन भरून घेण्यास नगरपालिका टाळाटाळ करत आहे. 

शेवगाव शहरातील सर्व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना सातपुते नगर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम होत आहे. तेथील महिलांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. गरिबांना पाणी आणण्यासाठी वणवण फिरावे लागते. तरी सातपुते नगर येथील नागरिकांच्या पाण्याचे कोटेशन नगरपालिकेने भरून घ्यावेत. व त्यांच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करावी असेही काकडे यांनी सांगितले. या घेराओ आंदोलनामध्ये मंगल गोरे, संगीता रुपेकर, सविता डोईफोडे, जयश्री तमानके, गीतांजली ढाकणे, आशा केदार, छाया बर्ड, सुनिता भवर, श्यामला घोडशिंदे, कल्पना कांबळे, रोहिणी पानसरे, उज्वला हुंबरे, मीना जताडे, रुबीना शेख, वर्षा निकम, पल्लवी शिनगारे, मनीषा मडके, सारिका घोडके, आदी महिलांसह अण्णा गोरे, गोरक्ष शिंदे, सुनील केदार, दीपक रुपेकर, मोहन कांबळे यावेळी उपस्थित होते.