Breaking News

कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सरिता मोरे?


कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरिता नंदकुमार मोरे यांचे नाव निश्‍चित झाले. उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या भूपाल शेटे यांच्या नावावर एकमत झाले आहे. महापौर आणि उपमहापौर निवड 10 डिसेंबरला होणार आहे. भाजपकडून महापौरपदासाठी जयश्री जाधव, तर उपमहापौरपदासाठी ताराराणी आघाडीच्या कमलाकर भोपळे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. 

महापौरपदाच्या निवडणुकीत बंडखोरी होणार नाही. राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाणार नाही, याची खात्री आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सहा-सहा महिन्यांसाठी महापौरपद असेल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादीतील सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसारच पदे दिली जातील, असे त्यांनी सांगितले. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार यंदाचे महापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. खुला प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपदाचे आरक्षण आहे. 
.