Breaking News

आसनीच्या विकासासाठी कटिबध्द : रांजणे


केळघर (प्रतिनिधी) : आसनी (ता. जावली) या गावातील ग्रामस्थांनी गावात एकीच्या बळावर विविध योजना प्रभावीपणे राबवून गाव आदर्श केले आहे. आसनीतील प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जाणीवपूवर्क प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी दिली. जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना रांजणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जनसुविधा योजनेतंगर्त आसनी येथे सुचवलेल्या स्मशानभूमी शेडचे बांधकाम व सुधारणा या कामाच्या भूमीपूजनप्रसंगी आयोजित कायर्क्रमात ते बोलत होते. 


यावेळी राष्ट्रवादी आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष सागर धनावडे, पंचायत समिती सदस्या कांताबाई सुतार, सुनील जांभळे, सरपंच संतोष शेलार, शिवराम शेलार, तुषार धनावडे, माजी सरपंच वैशाली शेलार, नवनाथ शेलार, विष्णू धनावडे, यशवंत शेलार, बाजीराव शेलार, दीपेश शेलार, रामचंद्र सुतार आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी रांजणे यांच्या हस्ते स्मशानभूमीच्या जागेचे भूमीपूजन करण्यात आले. सागर धनावडे यांनी स्वागत केले. तुषार धनावडे यांनी आभार मानले. कायर्क्रमास आसनीतील ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.