Breaking News

दुष्काळाची पोकळ घोषणा नको, नुकसान भरपाई द्या

स्वाभिमानीच्या वतीने 18 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालयावर डफडेबजाव आंदोलन शेतकर्‍यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे- रविकांत तुपकरबुलडाणा: (ता. 16) शेतकरी हिताच्या योजनांची अमंलबजावणी करण्याऐवजी केवळ घोषणांचा पाऊस पाडून शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या भाजप सरकारला वठणीवर आनण्यासाठी व सोयाबीन कापसाची नुकसान भरपाई बरोबरच दुष्काळी योजनांच्या अंमलबजावणीसाठी बुलडाणा जिल्हयातील सर्वच तहसिल कार्यालयावर 18 डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने डफडे बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. 

या आंदोलनात शेतकर्‍यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेंशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. शासनाने बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त् म्हणून घोषीत केला. मात्र काही तालुके दुष्काळातून वगळण्यात आले. अदयाप एकाही दुष्काळी योजनाची अंमलबजावणी शासनाने केली नाही. शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा हवेत विरली आहे, शेतकर्‍यांच्या पिक विम्याचे पैसे अदयाप मिळाले नाहीत, गुरांच्या चार्‍यांचा प्रश्‍न्, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न् यावर सरकारने कोणतेही नियोजन केले नाही. 

सोयाबीन, कापासाची नुकसान भरपाई अदयाप शेतकर्‍यांना मिळाली नाही. या सार्‍या प्रश्‍नावर बुलडाणा येथे 9 डिसेंबर रोजी स्वाभिमानीच्या विदर्भ मराठवाडा विस्तारीत राज्य कार्यकारीणीच्या झालेल्या बैठकीत खा. राजू शेट्टी यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान 17 डिसेंबर पर्यंत सरकारने शेतकर्‍यांचा नुकसान भरपाई देवून दुष्काळी योजनांची अंमलबजावणी करावी अन्यथा विदर्भ मराठवाडयात टप्प्या टप्प्याने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला होता. 

त्यानुसार 18 डिसेंबर रोजी स्वाभिमानीच्या वतीने जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयावर डफडे बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी तहसिलदार यांना निवेदन देवून आठ दिवसात शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील टप्प्यात जिल्हाभरातील शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील याच्या होणार्‍या परिणामाला मात्र शासन जबाबादार राहील असा इशारा देत या सरकारला वठणीवर आनण्यासाठी जिल्हयातील शेतकर्‍यांनी त्या त्या तहसिल कार्यालयावर 18 डिसेंबरच्या डफडेबजाव आंदोलनात हजारोच्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहनही स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.