Breaking News

तळेगाव ग्रामस्थांचा जिओ टॉवरला बाय...बाय!


बीड, (प्रतिनिधी):- तळेगाव येथे ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेले जिओ टॉवर उभारण्याच्या कामाला येथील ग्रामस्थांनी विरोध केला असुन टॉवर उभारल्यास आंदोलन करुन असा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोनाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे यांनीही पाठिंबा दिला असुन कुठलीही दुर्घटना घडली तर यास सर्वश्री जिम्मेदार कंपनीच असेल असे पिंगळे यांनी म्हटले आहे.

तळेगाव येथे ३० फुटाच्या अंतरावर अंगणवाडी, बालवाडी आहे. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांना बसण्यासाठी चावडी उपचार घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रही आहेत. या परिसरात जिओ कंपनीने टॉवर उभारण्याची मंजुरी घेतली असुन या टॉवर उभारणीला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. टॉवरमुळे मानवाच्या शरीरावर ध्वनी तरंगामुळे दुष्पपरिणाम होण्याची शक्यता आहे. कुठलीही नैसर्गिक आपत्ती उदभवल्यास यास सर्वश्री जिम्मेदार कंपनीला धरले जाईल. या टॉवरला ग्रामस्थांनी विरोध केला असुन पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनाही या आशयाचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे हे देणार आहेत. या टॉवरचे स्थलांतर करावे नसता आंदोलन करण्याचा ईशारा सुशिल पिंगळे, सचिन महापुडे, भास्कर घोलप, जयराम घोलप, श्रावण चौरे, बंडू घोलप, आत्माराम घोलप, बबन काकडे, अशोक मस्के, उद्धव घोलप, बाळासाहेब लोंढे, बिभिषण सावळे, गोरख पवळ, गणेश मुंजाळ, सुग्रीव मस्के यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.