Breaking News

चॅम्पियन कप कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक


सातारा (प्रतिनिधी) : येथील चॅम्पियन कराटे क्लबने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत महाराष्ट्राबाहेरील खेळाडूही सहभागी झाले होते.

पुणे, रायगड, मध्यप्रदेश तसेच दमण येथील खेळाडूंनी या स्पर्धेला हजेरी लावली होती. महाराष्ट्राच्या संघाने प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक रोख 10 हजार रुपयांची पारितोषिके पटकावली. शंतनु जाधव याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब पटकावला.

इतर स्पर्धेत 6 वर्षाखालील मुले अर्थव पवार, 8 वर्षाखालील मुली किमया कुंठे, 10 वर्षाखालील मुली अलिशा चौधरी, 10 वर्षाखालील मुले अभिजित राजभोज, 12 वर्षाखालील मुली नम्रता शिवगण, 12 वर्षाखालील मुले शिलदीप गायकवाड व 14 वर्षाखालील मुली तेजश्री कटरे 14 वर्षाखालील मुले आदर्श गायकवाड, 18 वर्षाखालील मुले निखील सोनटक्के, 16 वर्षाखालील मुली तेजश्री वालाज यांनी बक्षिसे मिळवली.

स्पर्धेला पंच म्हणून प्रसाद सावंत,अविनाश मोरे, अमित देवे, विजय महाडिक, अमित गिरीगोसावी, प्रसाद विचारे, दिनेश मुरकट तांत्रिक पंच म्हणून विजय यांचे मार्गदर्शन लाभले. सुवर्ण कामगिरी करुन महाड टीमने जनरल चॅम्पियनशीप मिळवली. पुणे संघाने द्वितीय क्रमांकाची जनरल चॅम्पियन ट्राफी तर तृतीय क्रमाकांची जनरल ट्रॉफी रायगड संघाने मिळवली 
कराटे क्लबचे सिहान संतोष मोहिते यांनी नियोजन केले होते. त्यांना लिना कदम, रेणू खालगाटकर, राधिका छाबडा, जोती भरडे, भारती जगताप, तनिष्का, हेमा भोसले, रुचा त्यागी, राजेंद्र माने बॉडी बिल्डर सागर शिंदे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पाडला.