Breaking News

दुष्काळजन्य परिस्थितीत जनावरांसाठी उपाययोजना कराशेवगाव/प्रतिनिधी
 दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जनावरांचा चारा व पाणी प्रश्‍न सह उपाययोजना तातडीने हाती घेण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील चापडगाव येथे दि. 5  रोजी सकाळी शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर राष्ट्रवादीच्या वतीने रास्तारोको आंदोलन केले. तहसिलदार विनोद भामरे यांच्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले.
          शेवगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला आहे. तसेच ताजनपुर टप्पा 2 चे रखडलेल्या कामास निधी उपलब्ध करून काम पूर्ण करण्यात यावे या योजनेअंतर्गत बंधारे, गावतळे भरण्यात यावेत. शेतकर्‍यांचे आजपर्यंतचे कर्ज माफ करावे. वीज बिल माफ करून शेतकर्‍यांना पन्नास हजार रुपये तातडीचे अनुदान द्यावे, टंचाईग्रस्त भागात मागणीप्रमाणे तातडीने टँकर सुरु करण्यात यावेत. शेतकर्‍यांचा दोन वर्षाचा विमा मंजूर करावा. रोजगार हमीचे कामे तातडीने सुरु करण्यात यावेत. केसरी रेशनकार्ड धारकांना धान्य उपलब्ध करून देऊन दुष्काळजन्य परिस्थितीत उपाययोजना तातडीने हाती घेण्यात याव्यात. या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी रस्ता-रोको आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनकर्त्याची शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांनी भेट घेवून तातडीने उपाय योजना हाती घेवू असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात हनुमान पातकळ, अशोक पातकळ,  पंडित नेमाने, उपसभापती शिवाजी नेमाने, बापू खताळ, सुरेश मडके, एकनाथ कसाळ, कुंडलिक घोरतळे, संतोष पावसे, मोहित पारनेरे, रामेश्‍वर कातकडे, शहाजी जाधव, इनामभाई शेख, पांडुरंग बटूळे, बाळासाहेब विघ्ने, शहादेव पातकळ, रामेश्‍वर चेडे, सुदाम गोरे, नामदेव केदार, दिलीप पातकळ, दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या शेवगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.        
           
चौकट ः उपाययोजना न केल्यास आंदोलन....
डिसेंबर अखेर दुष्काळाबाबत उपाययोजना प्रशासनाने हाती न घेतल्यास दि. 1 जानेवारीला तहसील कार्यालयावर शेतकरी मुलाबाळ व जनावरांसह भव्य आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने यांनी दिला.