Breaking News

निमगाव वाघा येथे अपंग दिन साजरा


नगर । प्रतिनिधी -
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे जागतिक अपंग दिनानिमित्त स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, प्रहार अपंग क्रांती संघटना व निमगाव वाघा ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. तर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे दिव्यांगांना आवाहन करीत प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. 
यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सरपंच सुमन डोंगरे, कामगार तलाठी सौ.मेहेर, अनिल डोंगरे, ग्रामसेविका अंजुम शेख, प्रहार अपंग संघटनेचे नगर तालुकाध्यक्ष किशोर सुर्यवंशी, उपाध्यक्ष संजय पुंड, शहर सचिव बाबासाहेब महापुरे, शहर उपाध्यक्ष बाहुबली वायकर, भरत फलके, मुख्याध्यापक रामदास अडसुरे, अंकुश आतकर, शकुंतला गव्हाणे, विजय शिंदे, किरण सांगळे, जयराम जाधव, मयुर काळे, पै.संदीप डोंगरे, रंगनाथ शिंदे, दीपक गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.  
गावातील दिव्यांगांना मतदार यादीत नावनोंदणी, अपंगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र, विविध शासकीय योजनांचा लाभ याबाबत बाबासाहेब महापुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुलाब केदार, विनोद काळे, विजय गायकवाड, जनाबाई शिंदे, चैतन्य पवार, साईराज काळे, अंजली गायकवाड, बाळू फलके, विठ्ठल केदार या दिव्यांग विद्यार्थी व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. 
सूत्रसंचालन संजय पुंड यांनी केले. रामदास अडसुरे यांनी आभार मानले.