Breaking News

धनादेश न वठल्यामुळे आरोपीस शिक्षाबीड (प्रतिनिधी वाहन तारण कर्जापोटी पूर्णवादी नागरीक सहकारी बँक शाखा गेवराई यांना दिलेला (३५,०००/-) पस्तीस हजार रुपयांचा धनादेश न वठल्याप्रकरणी न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग गेवराई यांनी आरोपीस सुनावलेल्या एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा आणि रुपये छत्तीस हजाराचा दंड जिल्हा व सत्र न्यायालय, बीड कोर्टाने कायम ठेवून आरोपीचे अपिल खारीज केले आहे. 

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, बीड जिल्हा व सत्र न्यायाधिश सौ. प्राची प्र. कुलकर्णी यांचे कोर्टात फौजदारी अपिल क्र.२८/२०१६ हे प्रकरण दि. ११.०३.२०१६ रोजी बीड कोर्टात दाखल झाले. प्रकरणामध्ये कलम १३८ निगोशिएबल इन्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे फिर्यादी पुर्णवादी नागरीक सहकारी बँक लि.म.बीड शाखा गेवराई यांनी दि.१८.०९.२००२ रोजी वाहन तारण कर्ज आरोपीच्या नावे दिलेले होते. प्रकरणात कर्ज वसुली प्रकरणी फिर्यादी बँकेने नियमानुसार वाहन सहकार कायद्या प्रमाणे १०१ ची कार्यवाही करुन वाहन जप्त करुन त्याचा लिलाव करुन पैसे वसुली केली. तसेच आरोपीकडून फिर्यादी बँकेला वसुलीपोटी दिलेला धनादेश रुपये ३५,०००/- (पस्तीस हजार रुपये) न वटल्यामुळे फिर्यादी बँकेने आरोपीचे विरोधात नियमानुसार कार्यवाही केली. 

न्यायदंडाधिकारी साहेब प्रथम वर्ग गेवराई यांचे कोर्टात एस.सी.सी.नं. ६९०/२००६ कार्यवाही मध्ये दि. २०.०२.२०१६ रोजी मा.३ रे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग गेवराई यांनी निकालपत्रा आधारे फिर्यादी यांनी दाखल केलेल्या केसमध्ये आरोपीला १ (एक महिन्याची) सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली व आरोपीला रु.३६,०००/- (छत्तीस हजार रुपये) फाईन म्हणून कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले. पैसे जमा न केल्यास आरोपीला १ महिन्याची साधी कैद करण्याचा आदेश संमत झाला. फिर्यादी रु. ३५,०००/- (पस्तीस हजार) हे बँकेस देण्याचा आदेश संमत करण्यात आला. प्रकरणात गेवराई येथील कोर्टात फिर्यादी बँकेच्या वतीे ऍड. एस.डी. डोळे यांनी समर्थपणे बाजु मांडली. वरील प्रकरण बीड येथे फौजदारी अपिलाकरीता दाखल झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश सौ. प्राची प्र.कुलकर्णी यांचे समोर युक्तीवादासाठी ठेवण्यात आल्यानंतर प्रकरणातील कागदपत्र पाहता साक्ष पुरावे, दस्त पाहता व ऍड. एस.डी. डोळे (राक्षसभूवनकर) यांनी फिर्यादी बँक जन-सामान्यांचा पैसे बँकेच्या ठेवीच्या स्वरुपात सांभाळते व त्यांना त्यावर व्याज देते तसेच गरजु ग्राहकांना विविध कारणासाठी व्यवसायासाठी कर्ज व्याजाच्या स्वरुपात देत.

 कर्जदारांकडून कायदेशीर स्वरुपात कर्ज देय रक्कम फेड करणे ही त्याची कायदेशीर जबाबदारी असल्यामुळे बँकेचे कर्ज तो नाकारु शकत नाही. वरील प्रकरणात आरोपीने त्याची कायदेशीर जबाबदारी टाळून बँकेला धनादेश दिल्यानंतर तो न वटल्यामुळे गुन्हा सिध्द झालेला आहे. त्यामुळे आरोपीची गेवराई कोर्टाने दिलेली शिक्षा १ (एक महिना) सश्रम कारावास मा. जिल्हा व सत्र न्यायालय, बीड कोर्टाने झालेली शिक्षा कायम ठेवून आरोपीचे अपिल खारीज करण्याची विनंती फिर्यादीच्यावतीने करण्यात आली. वरील प्रकरणात मा.जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांनी गेवराई कोर्टाचा निकाल कायम ठेवून आरोपीची शिक्षा कायम केली व आरोपीचे अपिल खारीज करण्यात आले. वरील प्रकरणांकडे बँक व विधिज्ञ यांचे लक्ष लागलेलेे होते.