Breaking News

सैनिकी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनपद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार दि. ९ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित केले असून या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आता देशाच्या सैन्य दलामध्ये कॅप्टन पदावर असणारे अभिजित शर्मा आणि दुसरे माजी विद्यार्थी सध्या भारतीय नवदलातील लेफ्टनंट निल जगधने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कमांडंट कर्नल भरत कुमार यांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना सौ शालिनी ताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या स्नेह संमेलनासाठी ब्रिलियंट स्कूलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे पाटील या हि प्रमुख पाहुण्याम्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पालकांनी मोठ्या संख्येने राहावे असे आवाहन प्राचार्य सुधीर मोरेआणि शिक्षकांनी केले आहे