Breaking News

दिल्लीत इमारतीवरून पडून कोल्हापूरातील शेतकर्‍याचा मृत्यू


नवी दिल्ली: दिल्लीच्या पहाडगंज परिसरातील आंबेडकर भवनाच्या इमारतीवरून पडून महाराष्ट्रातील एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. मृत शेतकर्‍याचे नाव करण संत (52) असून ते कोल्हापूरचे रहिवाशी आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार किरण संत आंबेडकर भवनाच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडले; मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याबद्दल अजून कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांनी दिली. 

दिल्लीत शुक्रवारी देशभरातील शेतकरी संघटनांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात खासदार राजू शेट्टीदेखील सहभागी झाले होते. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले करण संत (वय 45) हे देखील मोर्चासाठी दिल्लीत गेले होते.