Breaking News

जनसंपर्क अभियाना दरम्यान सेना कार्यकर्त्यांचा काँगे्रस मध्ये प्रवेशचिखली,(प्रतिनिधी): चिखली तालुका काँगे्रसच्या वतीने सुरू असलेल्या जनसंपर्क अभियांना दरम्यान इसोली व अमडापुर परीसरातील कार्यकर्ते व शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख कारखेड येथील विजय नरसिंग राउत यांनी त्यांच्या सहकार्यासह आमदार राहुल  बोंद्रे यांच्या कार्यपध्दतीवर विश्‍वास दाखवित कॉगे्रसमध्ये प्रवेश घेतला.

         विद्यमान सेना भाजप सरकारकडुन केली जाणारी घोषणांची आतशबाजी व शुन्य आमलबजावंनी याचा कंटाळा आल्याने व राज्यात आणि देशात काँगे्रसचे सरकार आले तरच ग्रामीण भागातील जनतेला आच्छे दिन येतील. यामुळे काँगे्रस मध्ये प्रवेश घेण्याचा व कॉगे्रसचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर चिखली विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल बोंद्रे हे काँगे्रसच्या ध्येय धोरणानुसार सर्व समावेशक काम करीत असुन मतदार संघातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून चालण्याची त्यांची विचारधारा पाहता त्यांचे नेतृत्वावर विश्‍वास ठेवून काँगे्रसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

     कारखेड तालुका चिखली येथे जनसंपर्क यात्रे दरम्यान झालेल्या या प्रवेशाच्या वेळी चिखली तालुका काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, समाधान सुपेकर, सेवादलाचे अध्यक्ष गजानन परिहार, भिमराव महाराज हिवरकर, युवक कॉगे्रसचे जिल्हाउपाध्यक्ष राहुल सवडतकर, शहर अध्यक्ष शुभम पडधान, रामेश्‍वर भुसारी, सुरेंंद्र खपके, प्रसाद ठेंग, गोविंद येवले, व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.