Breaking News

मंत्रीमंडळाचा निर्णय झाला आता शासन निर्णय कधी? पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या बैठकीत कर्मचार्‍यांचा सवालबुलडाणा,(प्रतिनिधी) पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना जगण्याचा आधार देणारा कंत्राटी पध्दतीने सरकारी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. शासनाने गठीत केलेल्या शिवाजीराव निलंगेकर समितीतीच्या अशासकीय सदस्या रेखा अहिरराव यांनी दिलेल्या अहवालावरून मंत्रीमंडळाने 11 डिसेंबर रोजी हा निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभरातील अंशकालीन कर्मचार्‍यांनी स्वागत तर केले, शसान निर्णय कधी काढणार? असा सवाल उपस्थित करून मंत्री मंडळाच्या निर्णयानंतर आता शासन निर्णय काढून त्याची त्वरीत अंमलबजावणी करा अशी मागणी पदविधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी केली.

येथील प्रशासकीय इमारत परिसरात रविवार 16 डिसेंबर रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा सचिव गणेश मांजरे यांनी पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांचे प्रश्‍नांची सोडवणुक करत कोणाच्याही भुलथापाला बळी पडुन आपली आर्थीक फसवणूक करून घेवू नका. बर्‍याच प्रतिक्षेनंतर अंशकालीन कर्मचारी संघटनेचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल ना.शिवाजी निलंगेकर व अशासकीय सदस्य रेखा अहिररवा यांचा सत्कार करण्या संदर्भात माहिती देण्यात आली. जिल्हा कोषाध्यक्ष संजय पवार यांनी आगामी काळातील सभेचे नियोजन व तालुकास्तरावरुन संपर्क ठेवण्याचे आवाहन केले.

जिल्हा उपाध्यक्ष राजेश लहाने यांनी संघटनेच्या कार्याबद्दल विस्तृत विवेचन करत मोलाची माहिती दिली. जिल्हा संघटक संजय टेकाळे यांनीही आभार मानत संघटनेच्या कार्यावर प्रकाश टाकला.या बैठकीत नवीन कार्यकारिणीही गठीत करण्यात आली. तर दिवंगत कर्मचार्‍यांना श्रध्दांजलीही वाहण्यात आली.

या बैठकीला मीनाक्षी देशमुख, सुनंदा खवसे, विजया कुळकर्णी, विजया सुरडकर, सुनिता गोरे, प्रणोती जोशी, चिखली तालुका अध्यक्ष भारत खरात, बुलडाणा तालुका अध्यक्ष संजय गवई, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष परमेश्‍वर वाघ, सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष भास्कर खरात, मोताळा तालुका अध्यक्ष अनिल खंडागळे, मेहकर भारत गवई, लोणार तालुका अध्यक्ष श्रीराम राठोड, नांदुरा तालुका अध्यक्ष रविंद्र जोशी,मलकापुर तालुका अध्यक्ष कैलास श्रीवास, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष रवी ऊगले,गोविदा इंगळे, रविंद्र गोदरकर,मकरंद देशपांडे,राजेंद्र सावळे,शे.कादर शे.युसुफ,सुनिल देशमुख,रविंद्र चिंचोळकर,विजय काळे यांचेसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.