Breaking News

कांदा उत्पादकाच्या मनीऑर्डरची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल


नाशिक (प्रतिनिधी)ः नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांच्या तक्रारीची थेट पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कार्यालयाने दखल घेतली असून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल मागितलाआहे. कांद्याला कमी भाव मिळत असल्याने साठे यांनी मोदी यांना 1064 रुपयांची मनीऑर्डर केली होती.

कांदा प्रश्‍नी पंतप्रधान कार्यालयाने नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती मागितली आहे. कांद्याला 100 ते 200 रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. महिन्याभरात 2100 ते 2500 रुपये क्विंटलचा कांदा अवघा 100 ते 200 रुपये क्विंटल कसा झाला, त्यावर प्रशासनानं काय केले, अशी विचारणादेखीस या कार्यालयाने केली आहे.