Breaking News

चंदगड तालुक्यात तासभर मुसळधार पाऊस; थंडी कमीकोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. पारगड भागात सुमारे तासभर झालेल्या या पावसामुळे आठवडी बाजारात पाणी शिरले होते. ऐन हिवाळ्यात झालेल्या या पावसामुळे शेतकरी अवाक झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असल्यामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. येत्या 24 तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 

राज्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या पाच-सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पूर्वेकडून वाहणार्‍या वार्‍यांमुळे हे ढग जमा झाले आहेत. दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर असलेली चक्राकार वार्‍यांची स्थिती आणि पूर्वेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे राज्यात हलके ढग स्थिरावले आहेत. त्यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.