Breaking News

सौ.लता राऊत यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार


बीड,(प्रतिनिधी): ओबीसी फाउंडेशन व ओबीसी जनगणना समिती यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न पदवी पुरस्कार शिवसेनेच्या विधानसभा सहसंघटक सौ लताताई राऊत यांना मुंबई येथे झालेल्या मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र रत्न पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजाच्या चळवळीत स्वतःला वाहून घेतले पाहिजे सामाजिक जीवनात वंचित गोरगरीब जनतेसाठी शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य घटकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे असे मत शिवसेना विधानसभा सहसंघटक तथा ओबीसी जनगणना समिती मराठवाडा संघटक सौ लताताई राऊत यांनी व्यक्त केले दिनांक १२ डिसेंबर रोजी मुंबई येथील मराठी पत्रकार संघाच्या सभाग्रहात महाराष्ट्र रत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या यावेळी ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे कार्याध्यक्ष काकासाहेब बोराडे तो विद्यार्थी आदमाने साहेबराव पानसरे आदी मान्यवरांच्या हस्ते सौ लताताई राऊत यांचा गौरव करण्यात आला.