Breaking News

पिण्याच्या पाण्यासाठी तामकणे ग्रामस्थासह महिलांचा मोर्चा


पाटण (प्रतिनिधी) : आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करावी या मागणीसाठी तांमकणे ता पाटण येथील ग्रामस्थांनी सोमवारी पाटण तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दरम्यान, पाणी पुरवठ्याचे हे काम तातडीने करावे, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, तामकणे गावांत पिण्याच्या पाण्याची सोय नसलेंने गावांतील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे पिण्याच्या पाण्यासाठी मागणी केली असता आमदार देसाई यांनी पाणीपुरवठा योजनेच्या अधिकार्‍यांना सूचना देऊन ताशा प्रकारचा अहवाल पाणी पुरवठा विभागाकडून मागविला असता संबंधित विभागाने नाथाची पाग येथून तांमकणे गावच्या हद्दीतील उद्भवातून या गावांस पिण्याच्या पाण्याची योजना करता येईल असा अहवाल दिला. त्यानंतर आमदार देसाई यांनी सन 2015/16 मध्ये आपल्या स्थानिक विकास निधीतून पिण्याच्या पाण्याची ग्रॅव्हीटी नळ पाणी पुरवठा योजने साठी सहा लाख रुपये निधी मंजूर केला. या कामास कार्यारंभ आदेश ही देण्यात आला.

त्यानंतर नाथांची पाग येथे ज्या ठिकाणी पाण्याचा उद्भव आहे ते ठिकाण तांमकणे गावच्या हद्दीत असून ते कुळातील असून त्या संदर्भात जमीन क्षेत्राचे संमती पत्र ही येथील जमीन मालकाने दिले आहे.दुर्दैवाने सध्या संमती देणारी व्यक्ती मयत झाली आहे. वास्तविक गेल्या 11 वर्षापासून आम्ही ग्रामस्थ आमच्या गावावरील डोंगरातून येणार्‍या डोंगरातून येणार्‍या पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करीत आहोत. नाथांची पाग येथील पाणी हे नाथांची पाग आणि तांमकणे ता दोन्ही गावाला पुरेल एवढे असल्याने आम्ही ग्रामस्थांनी मागणी केली आहे.मात्र कुणाच्या तरी राजकीय द्वेषापोटी या कामांत जाणीवपूर्वक अडथळा आणला जात आहे परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी आम्हा ग्रामस्थांना वण वण भटकावे लागत आहे. आम्हा ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची फार मोठी गैरसोय निर्माण होऊन आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र मौजे नाथांची पाग येथील ग्रामस्थ पिण्याचे पाणी हे आम्हास पिण्याकरिता न देता ते पाणी ते शेतीकरिता वापरत आहेत हे अन्याय कारक आहे.

दरम्यान, या ठिकाणी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हे पाणी नाथांची पाग या गावाला पुरेल असा अहवाल देवून सदर योजना तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिले असताना ही या योजनेचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही. तरी तामकणे गावातील ग्रामस्थ डोंगरातील ओंगळी पाणी साठवून त्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करीत आहे. या पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास होणारा धोका ओळखून शासनाने गंभीर्याने या बाबीची दखल घ्यावी आणि मंजूर करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची ग्रॅव्हीटी नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करावे, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ आणि महिला बेमुदत आंदोलन आणि उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पाटण आणि तहसीलदार, पाटण यांना दिल्या असून निवेदनावर दोनशेपेक्षा जास्त ग्रामस्थांच्या सह्या आहेत.