Breaking News

सालपे येथे शेतकर्‍याची आत्महत्या


वाठारस्टेशन (प्रतिनिधी) : सालपे (ता. फलटण) येथील भगवान मारुती शिंदे (वय 83) यांनी त्यांच्या राहत्या घरी काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सालपे येथील शेतकरी भगवान मारुती शिंदे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांचा पुतण्या तात्याबा नारायण शिंदे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. भगवान शिंदे यांनी बैठकीच्या खोलीत पंख्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी एका लग्नपत्रिकेच्या कागदावर आत्महत्येचे कारण लिहिले असून पोलिसांनी तो कागद ताब्यात घेतला आहेआपले साखरवाडी कारखान्यातील ऊसाचे बिल न निघाल्याने जीवाला व आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझे कुणाशी वैर नसून माझ्या मुलीला व वाड्यातील माणसांना या प्रकरणी कोणीही त्रास देऊ नये, असा मजकूर त्यांनी चिठ्ठीत लिहिला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश कुंभार व सहकारी करत आहेत.