Breaking News

सुदृढ अरोग्यासाठी लसिकरण मोहिम-देशमुख


अंबाजोगाइ, (प्रतिनिधी)- गोवर आणि रूबेला रोगांना रोकण्यासाठी अद्याप प्रभावी औषध उपलब्ध नसून या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. युवकांचे सुदृढ आरोग्य जपणे हा या लसीकरणाचा उद्देश असल्याचे जि. प. चे आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख म्हणाले. या मोहिमेचे तालुकास्तरीय उद्घाटन त्यांच्या हस्ते आपेगाव येथे शनिवारी (दि.१) करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जयजित शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, पं. स. सदस्य विठ्ठल ढगे, ग्रामपंचायत सदस्य आश्रुबा करडे, डॉ. बी. डी. फड, मुख्याध्यापक आर. बी. नागीशे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, तरूण पिढीच्या आरोग्याची काळजी घेवून आजारमुक्त पिढी तयार करण्यासाठी शासनाने ही मोहिम हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात बरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे देशमुख म्हणाले. अध्यक्षीय समारोप करतांना प्रा. जयजित शिंदे म्हणाले की, आयुष्यात अपंगत्व किंवा इतर रोग येऊ नये यासाठी ही लस दिली जात असून सर्व विद्यार्थ्यांनी ही लस टोचून घ्यावी. प्रास्ताविक करतांना तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे म्हणाले की, गोवर आणि रूबेला हे आजार होऊ नये म्हणून हे लसिकरण करण्यात येत आहे. पोलिओ चे जसे उच्चाटन केले आहे तसेच या रोगाची उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधाकर देशमुख यांनी केले तर सर्वांचे आभार मुख्याध्यापक आर. बी. नागीशे यांनी मानले.